ब्राझिलिया – ’लोहा लोहे को काटता है’ या उक्तीप्रमाणे ब्राझिलच्या वैज्ञानिकांनी हजारो लोकांच्या मृत्यूचे कारण ठरणार्या डेंग्यूशी लढण्याची तयारी केली आहे. त्यांनी अनुवांशिकरीत्या संवर्धित एडीज इजिप्टी प्रकारचे डास निर्माण करण्यासाठी एक ब्रीडर तयार केले आहे. लॅबमध्ये निर्माण होणारे हे डास खरे म्हणजे एडीज मच्छरांचा फैलाव रोखतील. एडीज डास चावल्यास डेंग्यू होतो.
डेंग्यूच्या नायनाटासाठी डासांची फौज
डासांचा कारखाना अशी ओळख असलेल्या या ब्रीडरवर ८,५०,००० डॉलर (सुमारे पाच कोटी रुपये) खर्च करण्यात आले आहेत. गेल्या शनिवारी सुरू झालेल्या ब्रीडरमधून वर्षाला ४० लाख डासांची पैदास केली जाईल. आरोग्य अधिकार्यांच्या माहितीनुसार लॅबमध्ये तयार करण्यात येणार्या डासांना विविध प्रकारच्या विषाणूंनीयुक्त इंजेक्शन दिली जातील.त्यांना डासांची पैदास होणार्या ठिकाणी सोडले जाईल. तेथे ते डासांची निर्मिती होण्याआधीच अळ्यांना मारतील. परिणामी डासांची संख्या घटेल.
ब्राझिलच्या जुआजीरो शहरात याची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात गेल्या सहा महिन्यात एडीज मच्छरांची संख्या ९० टक्क्यांनी घटली आहे.
