वॉशिंग्टन, दि. २० – अंतराळ तज्ज्ञांनी नासाचे स्पिटजलर टेलीस्कोपचा उपयोग करून एक असा ग्रह शोधून काढला. जो आमच्या सौरमंडळाचा शक्यतो सर्वात जवळ व आकारात आपल्या पृथ्वीच्या दोन तृतियांश आहे.
सौरमंडळाबाहेर पृथ्वीपेक्षा लहान ग्रह आढळला
नासाने सांगितले की, `३३ प्रकाश वर्ष दूर या संभावित गृहाचे नाव यूसीएफ १.०१ आहे. याचा व्यास ८४०० किलोमीटर असून, हा आपल्या सौरमंडळाबाहेरचा सर्वात जवळचा ग्रह आहे. जो आकारात पृथ्वीपेक्षा लहान आहे.‘
सौरमंडळाबाहेर आतापर्यंत काही ग्रहाचे संशोधन झाले आहे. जे आकारात आमच्या ग्रहाने लहान व यूसीएफ – १.०१ असे पहिला ग्रह आहे. ज्याची ओळख अंतराळ टेलिस्कोपशी झाली आहे.
ओरलँडो स्थित युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल फ्लोरिडाचे केविन स्टीवेंसन यांनी एका वक्तव्यात सांगितले, `आम्हाला स्पिटजलर टेलीस्कोपच्या मदतीने एक जवळील, खूप लहान व खूप उष्ण असण्याचे ठोस पुरावे मिळाले आहे. या नवीन उष्ण याची ओळख योगायोगाने झाली. जेव्हा स्टीवेंसन व त्याचे सहकर्मचारी नेप्च्युनचे आकार असणार्या सौरमंडळाबाहेर इतर एक ग्रह जीजे ४३६ बी चे अध्ययन करीत होते.’
