नाडालची ऑलिंपिकमधून माघार

माद्रिद, दि. २० –  तिसरा मानांकित स्पेनचा टेनिसपटू राफाएल नाडालने पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याचे कारण सांगत लंडन ऑलिंपिकमधून माघार घेतली आहे. ऑलिंपिकमध्ये सहभागी होऊ शकत नाही हे कळवताना अतिशय खेद वाटत असल्याची प्रतिक्रिया त्याने निवेदनाद्वारे दिली.

विशेष म्हणजे नाडाल स्पेनचा ध्वजवाहक होता. २००८च्या बीजिंग ऑलिंपिकमध्ये त्याने सुवर्णपदकाचीही कमाई केली होती. गेल्या महिन्यात विम्बल्डनच्या दुसर्‍या फेरीत पराभूत झाल्यावर नाडाल स्पर्धात्मक टेनिस खेळलेला नाही.