सुपरस्टार राजेश खन्ना यांना अखेरचा निरोप

मुंबई: बॉलीवूड मधील पहिले सुपरस्टार म्हणून रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजविलेले ‘काका’ राजेश खांना यांच्या पार्थिवावर आज पार्ले येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा नातू आरव याने त्यांच्या पार्थिवावर दाह संस्कार केले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी असंख्य चाहत्यांनी मोठी गर्दी केली.
     खन्ना यांच्या वांद्रे येथील निवासस्थानापासून सकाळी १० वाजता फुलांनी सजविलेल्या गाडीतून त्यांची अंतयात्रा काढण्यात आली. राजेश खन्ना यांची पत्नी अभिनेत्री डिम्पल, मुलगी रिंकी, जावई अक्षय कुमार, नातू आरव हे अंत्ययात्रेत सहभागी झाले. वांद्र्यापासून विले पार्ले स्मशानभूमीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून काकांच्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप दिला. खन्ना कुटुंबियांच्या सूचनेनुसार स्मशानात कुटुंबीय आणि बॉलीवूडचे कलाकार यांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही.


Leave a Comment