गुटखा बंदीवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब

मुंबई:गुटख्यावर बंदी घालण्याच्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ही बंदी शुक्रवारपासून अमलात येणार आहे. या निर्णयानुसार गुटखा आणि पानमसाल्याचे उत्पादन, विक्री आणि साठा करण्यावर बंदी असणार आहे.
     अन्न आणि औषध प्रशासन विभागाने वर्षभरात तपासलेल्या गुटखा आणि पान मसाल्याच्या ११७३ नमुन्यांपैकी तब्बल ८५३ नमुन्यांमध्ये मेग्नेशियम कार्बोनेट हा घटक घटक वापरला जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे गुटखा आणि पान मसाल्यावर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. कालांतराने ही मुदत वाढविण्यात येणार आहे.
     गुटख्यावर बंदी घालणारे महाराष्ट्र हे देशातील चौथे राज्य आहे. 

Leave a Comment