अश्लील नृत्य प्रकरणी बिग बीसह तारे, तारकांना नोटीस

चेन्नई: बिग बी अमिताभ बच्चन, सलमान खान, करीना कपूर, प्रियांका चोप्रा यांनी आयपीएल-५ च्या उद्घाटन समारंभात सेन्सॉर बोर्डाची मान्यता न घेता अश्लील नृत्य केल्याबद्दल मद्रास उच्चन्यायालयाने त्यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी जेबा कुमार यांनी याचिका दाखल केली आहे.
     चेन्नई येथे ३ एप्रिल रोजी झालेल्या आयपीएल-५ च्या उद्घाटन समारंभात अमिताभ बच्चन, सलमान खान, करीना कपूर, प्रियांका चोप्रा यांनी केलेले नृत्य अश्लील होते. सोनी सेट मेक्स वाहिनीने त्याचे एडीटिंग न करता त्याचे प्रक्षेपण केले. या काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा होत्या. त्यांचे लक्ष या नृत्यामुळे विचलीत झाले असे आक्षेप जेबा कुमार यांनी याचिकेत घेतले आहेत.
     या बाबत उच्चन्यायालयाचे न्यायधीश ए. सेल्वम यांनी नृत्यात सहभागी कलावंतासह आयपीएलचे कमिशनर राजीव शुक्ला, अमेरिकन पॉप स्टार केटी पेरी, ओस्ट्रेलियन क्रिकेटपटू डग बोलींजर आणि सोनी वाहिनीच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे.
     या याचिकेवर पुढील सुनावणी ३१ जुलाईला होणार आहे.

Leave a Comment