आरबीआय प्रस्तुत करणार १० व ५० रुपयांच्या नोटा

मुंबई, दि. २० – भारतीय रिझर्व बँक (आयबीआय) लवकरच रुपये चिन्हासह १० व ५० च्या नोटा प्रस्तुत करेल. या बाबीची माहिती केंद्रीय बँकेने दिली. २०१० मध्ये रुपयाच्या या चिन्हाला अधिकृत रुपाने अवलंबण्यात आले होते.

`महात्मा गांधी सीरीज-२००५’ असणार्‍या नोटावर आरबीआयचे गर्व्हनर डी. सुब्बाराव यांच्या स्वाक्षरी व्यतिरिक्त इंग्रजीचे `एल’ अक्षरासह रुपये खूण छपलेली असेल. या नोटाच्या मागील भागात नोट छपाईचे वर्ष २०१२ अंकित असेल.

आरबीआयने एक वक्तव्यात सांगितले की, या नोटाची बनावट ’महात्मा गांधी सीरीज -२००५’ चे १० व ५० रुपयाचे छपलेले पहिल्या नोटाप्रमाणे राहील. केंद्रीय बँकेने म्हटले की, आरबीआयद्वारे पूर्वी प्रसिद्ध केलेले १० व ५० च्या नोटा वैधानिक राहतील.

२०१० मध्ये अधिकृत रूपाने अंगीकृत केलेल्या रुपयाच्या या चिन्हाला देवनागरीचे व्यंजन ’र’ व एक क्षैतिज पट्टीला जोडून बनवण्यात आले आहे.