कानपूर: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर आझाद हिंद सेनेत कार्यरत असलेल्या केप्टन लक्ष्मी सेहगल यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कानपूर: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबरोबर आझाद हिंद सेनेत कार्यरत असलेल्या केप्टन लक्ष्मी सेहगल यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सेहगल या ९७ वर्षाच्या असून गेल्या काही दिवसापासून त्या आजारी आहेत. गुरुवारी सकाळी त्यांना सिव्हील लाईन्स येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आला.
व्यवसायाने वैद्यक तज्ज्ञ असलेल्या केप्टन लक्ष्मी यांनी आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंट या महिला सैनिकांच्या पथकाचे नेतृत्व केले. सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग आहे. त्यांना सन १९९८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.