शिर्डीच्या विश्वस्तांना सर्वोच्च न्यायालयाची चपराक

शिर्डी: शिर्डी येथील साई संस्थानाची नवी समिती बरखास्त करण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेऊन सर्वोच्च न्यायालयाने संस्थानाच्या विश्वस्तांना चपराक दिली आहे.   

नवीन विश्वस्त नेमण्यापूर्वी त्यासंबंधी योग्य ते नियम तयार करावेत आणि त्यानंतरच विश्वस्तांची नेमणूक करावी असे आदेश देऊन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने १३ मार्चला समिती बरखास्त केली. त्यानंतर १५ दिवसात नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यात यावे असे आदेशही न्यायालयाने दिले.  त्यानुसार राज्य शासनाने दि.२८ मार्चला जयंत ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी सात सदस्यांची नेमणूक केली. मात्र अहमदनगरचे शैलेश देठे यांनी या समितीबाबतही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेचा निकाल देताना उच्च न्यायालयाने नवी समितीही बरखास्त केली. या निर्णयाविरोधात नव्या विश्वस्तांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.

Leave a Comment