आमिरचा तलाश नोव्हेंबरमध्ये झळकणार

प्रत्येक गोष्टीचे प्लानिंग व्यवस्थीतपणे करणारा अभिनेता अमीर खानचा  बहुचर्चित तलाश हा चित्रपट वेगळ्या ढंगात तयार करण्याची लगबग सध्या सुरु असून  हा चित्रपट ३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती अमीर खान, रितेश सिद्धवानी आणि फरहान अख्तर यांनी एकत्र येऊन केली आहे. यापूर्वी या तिघानी २००१ साली दिल चाहता है या चित्रपटात एकत्रित काम केले होते. या चित्रपटाची कहाणी रिमा कागती हिने लिहली आहे. या चित्रपटाच्या बाबतीत गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे  तलाश  वेळेवर प्रदर्शित होणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. २००९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ३ इडीयटस या चित्रपटानंतरचा अमीर खानचा हा सर्वात मोठा चित्रपट आहे. या चित्रपटासाठी त्याने मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे हा चित्रपट ठरल्या वेळेत प्रदर्शित करण्याची जबाबदारी आमीरच्या टीमवर आहे.

तलाश या चित्रपटात अमिरसोबत नायिका म्हणून अभिनेत्री करीना कपूर व बऱ्याच दिवसापासून बॉलीवूड पासून काहीशी दूर राहिलेली अभिनेत्री राणी मुखर्जी  पुन्हा झळकणार आहे.

Leave a Comment