रुपया वधारल्याने सोन्यावर परिणाम शक्य

मुंबई दि.१६ – अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घट झाली असून , डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यही वधारल्यामुळे सोन्याचा प्रति दहा ग्रॅम भाव २९,४०० रुपयांजवळ राहील , असा अंदाज आहे.निर्यातदारांनी डॉलरची विक्री केल्याने गेल्या आठवड्यात रुपया वधारला आहे. त्यामुळे सोन्याच्या भावावाढीवर मर्यादा येणार आहे , असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

सोन्याचा भाव निश्चित करताना डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्यही विचारात घ्यावे लागेल. रुपया वधारल्यावर विक्रेत्यांना सोन्यासाठी कमी रक्कम द्यावी लागते. त्यामुळे स्थानिक सराफ बाजारात सोने स्वस्त होते.

सद्यस्थिती पाहता विक्रेत्याकडून रुपया वधारण्याचा फायदा ग्राहकांपर्यंत पोचविला जाऊ शकतो. रुपया वधारत असल्याने सोन्याचा १० ग्रॅमचा भाव २९ हजार ते २९,७०० रुपयांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.  गेल्या ऑगस्ट महिन्यांपासून रुपयाच्या मूल्यात ३० टक्के घट झाली. जूनमध्ये रुपयाच्या मूल्यात पाच टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 

Leave a Comment