विकी डोनर ठरला जॉनसाठी लकी

विकी डोनर या चित्रपटाच्या यशामुळे अभिनेता जॉन अब्राहम खऱ्या अर्थाने नशीबवान ठरला आहे. गेल्या काही दिवसापासून त्याच्याकडे चित्रपटाची रांग लागली आहे. सध्या तो एकाच वेळी पाच चित्रपटाच्या कामात बिझी असल्याने वृत्त आहे.

आगामी काळात जॉनच्या कंपनीचा पोलिटीकल थ्रिलर असलेला जाफना हा चित्रपट येत आहे. त्याशिवाय जॉन दिग्दर्शक सुजीत सरकारच्या हमारा बजाज या विनोदी चित्रपटात झळकणार आहे. सध्या या चित्रपटला फायनल टच देण्याचे काम सुरु आहे.  दिग्दर्शक संजय गुप्ताच्या शूटआउट एट वडाला या चित्रपटातून तो वेगळ्या  लूक मध्येच दिसणार आहे. तर अब्बास मस्तानच्या रेस २ मध्ये तो दिसणार आहे.  दोस्ताना चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही जॉन काम करत असून त्याच्या शुटींगच्या कामात तो सध्या व्यस्त आहे.

एकाच वेळी पाच चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगताना अभिनेता जॉन अब्रहाम म्हणाला की, विकी डोनर या चित्रपटाच्या यशामुळे कमी बजेट व नवीन कलाकारांसोबत चांगले काम केले तर प्रेक्षक स्वीकरतात हे शिकायला मिळाले.

Leave a Comment