कतरिनाचा बॅले डान्स

कतरिनाच्या मोहक अदांवर सगळेच `पागल’ आहेत. खुद्द सलमाननंदेखील हे मान्य केले आहे. पण, आता कतरिना आपल्या आगामी चित्रपट `एक था टायगर’मध्ये बॅले डान्स करताना दिसणार आहे.

`एक था टायगर’मधल्या एका गाण्यासाठी कतरिनाने बॅले डान्स शिकून घेतला आहे. कबीर खानच्या या आगामी पोजेक्टमध्ये कतरिना मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातल्या `माशा अल्ला’ या गाण्यासाठी बॅले डान्स थीमची आवश्यकता होती. ती योग्य रितीने वठवण्यासाठी कतरिनाने बॅले डान्सचे धडे घेतलेत. `एक था टायगर’ या चित्रपटात कतरिना तिचा पूर्वप्रेमी अभिनेता सलमान खानबरोबर दिसणार आहे.

या चित्रपटाच्या शूटींग दरम्यान सलमान आणि कतरिनाचे संबंध सुधारल्याचे चित्र दिसते आहे. आंबट-गोड संभाषणाने दोघंही एकमेकांना खूश करताना दिसतात. `एक था टायगर’ चित्रपटात कतरिना सलमानला `खूप झाले, आता तुला लग्न करायला हवे’ असे म्हणताना दिसणार आहे. असे असले तरी प्रत्यक्षात मात्र कतरिना अजून तरी सलमानला लग्नाचा सल्ला देत नाही. दोन दिवसांपूर्वीच पत्रकारांनी तिला ४६ वर्षीय सलमानच्या लग्नाविषयी छेडले असता, ’सलमानने लग्न वयाच्या कितव्या वर्षी करायचे हा त्याचा निर्णय त्यानेच घ्यावा, दुसर्‍यांनी नाही असे मला वाटतेय’, असे कतरिनाने म्हटले.

Leave a Comment