सुनिता करणार अंतराळातून मतदान

वॉशिंग्टन, दि. १४  –  आता, भारतीय वंशाची पण अमेरिकेची नागरिक असलेली अंतराळावीर सुनिता विल्यम्स अंतराळातून मतदान करणारी पहिली महिला ठरणार आहे.

१४ जुलै २०१२ पासून सुनिता विल्यम्स ही अवकाश मोहिमेवर निघणार आहे. तिची ही मोहीम पूर्ण होते आहे १२ नोव्हेंबर रोजी. पण, या दरम्यान अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. ही निवडणूक होतेय सुनिता परण्याच्या सहा दिवस अगोदर म्हणजेच ६ नोव्हेंबर रोजी… आणि सुनिता मात्र जागरुक नागरिक आहे. आपला मतदानाचा हक्क आणि कर्तव्य तिला पार पाडायचे. त्यासाठी ती चक्क अंतराळातून तिच्या आवडत्या राष्ट्रध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करणार आहे.

सुनिता विल्यम्स हिचे वडील गुजराती आहेत. मात्र, सुनिताने अमेरिकचे नागरिकत्व स्विकारले आहे. ती फ्लोरिडा राज्याची मतदार आहे. अवकाशातून मतदान करण्यासाठी तिला आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र `व्होटींग फ्रॉम स्पेस’ हा कार्यक्रम राबवणार आहे.

Leave a Comment