
लंडन,दि. ११ – भारताने महात्मा गांधींशी संबंधित हजारो पत्र व दस्तावेजसहित इतर दुर्मिळ सामग्री खरेदी केली आहे. या अभिलेखागारात गांधींचे वास्तुविद हर्मन कालेनबाखसह त्यांचे वादग्रस्त संबंधाशी संबंधित दस्तावेज समाविष्ट आहे. लिलावकर्ता `सदबी’ ने म्हटले की, हा करार एक खासगी सौद्याअंतर्गत करण्यात आला. त्याने याबाबत खुलासा केला नाही की, भारत सरकारने या दस्तावेजासाठी किती रक्कम चुकता केली. लिलावकर्त्याकडून दिलेल्या वक्तव्यात सांगण्यात आले की, तो ही घोषणा करताना खुप आनंदी आहे की, गांधी, कालेनबाख अभिलेखागारला एक खासगी सौद्यात भारत सरकारला विकण्यात आले.
