बोलणे कमी करून खेळाकडे लक्ष द्या – गांगुली

काही दिवसापासून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूकडून केवळ एकमेकावर आरोप व प्रत्यारोप केले जात आहेत. हे करत बसण्यापेक्षा खेळावर लक्ष केंद्रित करावे असा सल्ला भारताचा एकेकाळचा यशस्वी कर्णधार सौरव गांगुलीने दिला आहे.

काही दिवसापूर्वीच भारताचा आघाडीचा फलंदाज वीरेंद्र सेहवागने सर्वाच्या कामगिरीमुळेच भारतीय संघाला विश्वचषक जिंकता आला असे म्हणत कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर निशाणा साधला होता. रविवारीच गांगुलीचा वाढदिवस पार पडला त्यानंतर तो पत्रकराशी बोलताना म्हणाला, वीरू एक परिपक्व असा खेळाडू आहे त्यामुळे तो अशा प्रकारचा आरोप करेल असे मला तरी वाटत नाही. सध्या तरी मैदानावर चांगली काम करून दाखवयाची वेळ आहे. त्यामुळे खेळाडूंनी बोलण्यापेक्षा खेळावर अधिक लक्ष केंद्रित करावे. भविष्यात माझ्याकडे अजून एक वर्ष क्रिकेट खेळण्याचा पुणे वारीयार्सच्या माध्यमातून पर्याय उपलब्ध आहे. त्यामुळे वय ३९ असेल अथवा ४० त्याचा खेळण्यावर काहीच परिणाम होत नाही.

ऑलम्पिकमध्ये महेश भूपतीने पेस सोबत खेळण्याची तयारी दर्शविण्यास हवी होती. त्यामुळे भारतीय टेनिस संघाला एखादे तरी पदक मिळवता आले असते. इतर खेळाडूच्या तुलनेत पेस हा सर्वोत्तम टेनिसपटू असल्याचेही गांगुलीने स्पष्ट केले.

Leave a Comment