पाकिस्तानला जाणार नाही- सलमान खान

एक था टायगर या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता सलमान खान व चित्रपट दिग्दर्शक कबीर खान पाकिस्तानला जाणार आहेत असे वृत्त काही वर्तमानपत्रातून प्रकाशित झाले होते. मात्र दोघांनी या वृताचे खंडन केले आहे. सध्या तरी पाकिस्तान मध्ये जाण्याची टीमची इच्छा नसल्याचा खुलासा यावेळी सलमान खानने केला.

याबाबत बोलताना सलमान म्हणाला की, मी आणि कबीर खान दोघेही पाकिस्तानला जाणार आहोत अशी बातमी  वर्तमानपत्रात वाचली आणि मलाच आश्चर्य वाटले. अर्थात ही निव्वळ अफवा आहे. पाकिस्तानमध्ये जाण्याची वेळ जर आली तर आम्ही दोघेजण ही जाऊ मात्र अजून तरी तशी वेळ आली नाही.

दिग्दर्शक कबीर खान म्हणाले की, पाकिस्तानात जाण्याची आमची योजना साध्या तरी नाही.  मात्र भविष्यात तशी वेळ आली तर निश्चित जाण्याबाबत विचार करू. पाकिस्तानात एक था टायगर या चित्रपटाच्या प्रेमोवर बंदी घालण्यात आलेली नाही.  चित्रपटाला त्या ठिकाणी अजून ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही. ते मिळाल्यावर त्या ठिकाणी चित्रपट प्रदर्शित होईल असे मला वाटते.  सलमान व कतरिनाचा हा बहुचर्चित चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे

Leave a Comment