मुंबई दि.१३ – इन्फोसिसने पुढील काळात उत्पन्नात कमी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केल्याने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रासहित सर्वच कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री होऊन मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २५६.५९ अंशांनी घसरला. निर्देशांकाची ही सात आठवड्यांतील मोठी घसरण आहे.
इन्फोसिसचे निकाल आल्यानंतर गुंतवणूकदारांचा मूड बिघडला. त्याचे तपशील येऊ लागल्यानंतर आणखीनच विक्री वाढली. इन्फोसिसचा शेअर ८ टक्क्यांनी गडगडला इन्फोसिसच्या निकालांनी सर्वच पातळ्यांवर निराशा केली.
आता या क्षेत्रात किंमत युद्ध सुरू होऊन त्याचा इतर कंपन्यांना फटका बसेल की काय अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे,’ असे बार्कलेजचे विश्लेषक भुवनेशसिग यांनी सांगितले. टीसीएसचे निकाल चांगले लागूनही इन्फोसिसची झळ त्या शेअरलाही बसली आणि तो १.८० टक्क्यांनी गडगडला.