गेल्या काही दिवसात जॉन अब्राहमने त्याच्या लूकमध्ये खूप बदल केला आहे. काही दिवसात तो भारतीय तरुणाचा आयडॉल होणार असल्याचे मानले जात आहे. आगामी काळात येत असलेल्या त्याच्या शूटआउट एट वडाला या चित्रपटातून तो वेगळ्या लूक मध्येच दिसणार आहे.

या चित्रपटात जॉन अब्राहम एका मन्या नावाच्या गँगस्टार ची भूमिका करीत आहे. या नवीन भूमिकेत जॉन कपळावर मोठा टिळा लावणार आहे. ही रागीट स्वभाव असलेल्या व्यक्तीची भूमिका आहे. त्यामुळे त्यांने पूर्वीच्या तुलनेत लूकमधे किती तरी बदल केला आहे.
शूटआउट एट वडाला या चित्रपटातून जॉन सोबत अभिनेता तुषार कपूर व मुनीरही दिसणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरु असून पहाटे तीन वाजल्यापासून कडक अशी सुरक्षा व्यवस्था असताना देखील नवीन लूकमध्ये जॉनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत आहे. .