बिहारच्या बाहुबलीची तुरूंगात बसून पीएचडी पूर्ण

दिल्ली, दि. ११ – बिहारच्या आणखी एक बाहुबलीने तुरूंगातून पीएचडी केली आहे. याप्रकारे विजय कुमार शुक्ला उर्फ मुन्ना शुक्ला बिहारचे तिसरे नेते बनले ज्याने कैदी रूपात पीएचडीची डिग्री प्राप्त केली. तो बिहारचे चर्चित नेते व मंत्री बृजबिहारी प्रसाद यांच्या हत्या प्रकरणी सध्या मुजफ्फरपुर तुरूंगात बंद आहे. बिहारचे माजी मंत्री बृज बिहारी प्रसाद यांची हत्या १९९८ मध्ये झाली होती.

शुक्लाने आपले संशोधन हिन्दी भाषेत केले. त्याचा विषय … हिन्दी उपन्यासो में राजनीतिक जागरूकता की अभिव्यक्ति. त्याच्या संशोधनाचे गाइड रामेश्‍वर कॉलेजचे देवानंद प्रसाद आहेत. प्रसाद म्हणाले की, शुक्लाने शुक्रवारी आपली अंतिम मुलाखत दिली. आता त्याला बीआर आंबेडकर बिहार विद्यापीठातून डॉक्टरेटची डिग्री मिळेल.

मुन्ना शुक्लाची बाहुबली नेत्या रूपात बिहारमध्ये ख्याती प्राप्त आहे. मुन्ना शुक्ला तेव्हा चर्चेत आले होते जेव्हा १९९४ मध्ये गोपालगंजचे डीएम जी कृष्णैया यांचा त्याच्यावर हत्याचा आरोप लागला होता. याबाबत त्याच्यावर स्थानिक न्यायालयाने आजीवन करावासची शिक्षा सुनावली होती. परंतु त्याना पाटना हायकोर्टने निर्दोष मुक्त करण्यात आले. कृष्णैया यांची हत्या त्यावेळी झाली जेव्हा मुन्ना शुक्ला यांच्या भावाच्या हत्या विरोधात मेळावा काढला जात होता आणि कृष्णैया त्यादरम्यान समोर आले. मानले जात होते की, मुन्ना शुक्ला बाहुबली भावाच्या हत्येत प्रशासनाचा हात होता. त्यानंतर मुन्ना शुक्ला बाहुबली बनले. तसेच त्यांनी राजकारणात उतरण्याचा प्रयत्नही केला. परंतु तुरूंगात गेल्यामुळे त्यांचा मार्ग विस्कळीत झाला परंतु त्याच्या पत्नीने २०१० मध्ये वैशालीच्या लालगंजने निवडणुक लढवली आणि अनु शुक्ला विजयी देखील झाल्या.