एकता कपूरचा बहुचर्चित क्या सुपर कुल है हम चित्रपट येत्या काही दिवसातच रिलीज होत आहे. याची चांगलीच धास्ती एकताने घेतलेली दिसत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून तिचे वजन कमी झाले आहे.

एकता कपूरचा बहुचर्चित क्या सुपर कुल है हम चित्रपट येत्या काही दिवसातच रिलीज होत आहे. याची चांगलीच धास्ती एकताने घेतलेली दिसत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून तिचे वजन कमी झाले आहे.
सध्या बॉलीवूडमध्ये एकता कपूरच्या क्या सुपर कुल है हम या बोल्ड चित्रपटची चर्चा आहे. नुकत्याच झालेल्या प्रोमोमुळे त्याची सर्वत्र जास्तच चर्चा आहे. प्रेक्षकांना चित्रपटाचा पहिला भाग पसंत पडला आहे. मात्र दुसरा भाग आवडला नाही तर प्रेक्षक व तिचे काही हितचिंतक काय म्हणतील या कारणाने काही दिवसापासून वजन कमी झाले असल्याचे खुद्द एकता कपूरने कबूल केले आहे. एकता म्हणाली की, क्या सुपर कुल है हम हा चित्रपट बोल्ड आणि विनोदी आहे. हा चित्रपट युवकासाठी आहे. या चित्रपटाचा पूर्वीचा भाग २००५ साली क्या कुल है हम आला होता. तो चित्रपट ज्यांना आवडला आहे त्यांच्यासाठी हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.
या चित्रपटचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर काहींनी टीका केली होती. त्यामुळे दुसरा भाग प्रसिद्ध झाल्यानंतर पुन्हा टीका होईल का अशी भीती वाटते त्यामुळे मी आणि अभिनेता रितेश देशमुख चित्रपट रिलीज झाल्यानंतर काही दिवस मुंबई सोडून बाहेर जाणार असल्याचे एकता कपूरने सांगितले.