
नवी दिल्ली दि.११ – गेली तीन वर्षे भारतीय बाजारपेठेवर वर्चस्व मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या जर्मनीच्या तीन महाकाय कार उत्पादक कंपन्यांतच आता विक्री शर्यत सुरू झाली आहे. गेली तीन वर्षे सतत प्रथम क्रमांकावर असणारी बीएमडब्ल्यू , दुसर्या क्रमांकावर असणारी मर्सिडीज बेंझ, आणि तिसर्या क्रमांकावर असणारी ऑडी यांच्यातील ही रेस उत्कंठावर्धक होत चालली आहे. कांही महिन्यांपूर्वीच मर्सिडीजला मागे टाकलेल्या ऑडीने आता टॉप गिअर बीएमडब्ल्यूलाही मागे टाकले असून जून २०१२ मध्ये ७५९ गाड्या विकून या स्पर्धेत टॉपचे स्थान प्राप्त केले आहे. भारतीय बाजारात पहिल्यांदाच ऑडीने ही कामगिरी बजावली आहे. जूनमध्ये बीएमडब्ल्यूने ७५० गाड्या विकल्या आहेत.
