
पाटणा दि.९ – कर्नाटकात सदानंद गौडा ऐवजी जगदीश शेट्टर यांची मुख्यमंत्रिपदी नियुक्ती करण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा निर्णय योग्य असल्याचे मत ‘एनडीए’ चे अध्यक्ष व संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत राज्यातील लिंगायत समाजाला पक्षाबरोबर ठेवण्यासाठी घेतलेला नेतृत्व बदलाचा निर्णय योग्य आहे, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
