नवी दिल्ली दि.६ – रुपयाचे अवमूल्यन, वाढती महागाई आणि सरकारी तिजोरीत होऊ लागलेला खडखडाट यामुळे वस्त्रोद्योग, सिमेंट आणि तत्सम औद्योगिक क्षेत्रातील विकासाचा वेग एप्रिल ते जून या तिमाहीत घसरला आहे.

नवी दिल्ली दि.६ – रुपयाचे अवमूल्यन, वाढती महागाई आणि सरकारी तिजोरीत होऊ लागलेला खडखडाट यामुळे वस्त्रोद्योग, सिमेंट आणि तत्सम औद्योगिक क्षेत्रातील विकासाचा वेग एप्रिल ते जून या तिमाहीत घसरला आहे.
सीआयआय, एस्कॉनने केलेल्या सर्वेक्षणात म्हटले आहे की, औद्योगिक क्षेत्रात क्षेत्रनिहाय विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, जवळजवळ सर्वच क्षेत्रात पहिल्या तिमाहीत पुढील उत्पादनात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली होती.
हे सर्वेक्षण ११४ क्षेत्रातील २५ हजार पेक्षा अधिक कंपन्यांत करण्यात आले होते. त्यात इलेक्ट्रॉनिक, मोटर्स, रबरी वस्तू, टायर व कच्चे तेल या क्षेत्रात ० ते १० टक्के वाढीची शक्यता आहे.
सीआयआयचे महासंचालक चंद्रजित बॅनर्जी यांनी म्हटले ओ की, एस्कॉनने केलेल्या सर्वेक्षणात सामील झालेल्यांनी असे मत व्यक्त केले की, महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिझर्व बँकेने जे कठोर निर्णय घेतले, त्यामुळे विकास दरवाढीत मंदी आलेली आहे. या मंदीच्या प्रभावाने मागणीतही घट झाली आहे. विकास दरातील घसरण रोखण्यासाठी सरकार व रिझर्व बँकने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे, असे बॅनर्जी यांनी मत व्यक्त केले आहे.