`आशिकी’च्या सिक्वेलचे चित्रिकरण लवकरच सुरू

१९९० साली आलेल्या `आशिकी’ चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळविली. चित्रपटातील सर्व गीतांबरोबरच अभिनेता राहुल रॉयलाही रसिक-प्रेक्षकांनी उचलून धरले होते. तरुणांमध्ये तर या चित्रपटाविषयी विशेष क्रेझ होती. त्या पार्श्‍वभूमीवरच चित्रपट निर्माते राहुल सुरी यांनी या चित्रपटाचा दुसरा भाग आणण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच म्हणजे पुढील महिन्यातच सुरू होत आहे.

सध्या बॉलीवूडमध्ये चित्रपटांचा सिक्वेल काढण्याचा ट्रेंड आला आहे. यापूर्वी अनेक चित्रपटांचे काढलेले सिक्वेलही चांगलेच गाजले आहे. तीच बाब लक्षात घेऊन आशिकीचा सिक्वेल काढण्याचा विचार सुरी यांनी केला. अर्थातच आशिकीच्या या सिक्वलमध्ये राहुल रॉयऐवजी आपल्याला आदित्या रॉय कपूर आणि अनू अगरवालऐवजी श्रद्धा कपूरला पाहायला मिळणार आहे.

`आशिकी’ १९९० मधील अत्यंत लोकप्रिय ठरला होता, परंतू येणारा `आशिकी-२’च्या कथानकाचा आधीच्या चित्रपटाशी कोणताही संबंध नाही. असे मोहित सुरी यांनी म्हटले आहे. ह्या चित्रपटाचे कथानक नवीन असून, यात आठ गाण्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे बर्‍याच दिवसांनी म्युझिकल लव्ह स्टोरी येणार असल्याने `आशिकी-२’ बद्दल तरुणांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Comment