आता मिनिटात मिळणार बँकेची माहिती

मुंबई, दि. ९ –  ग्राहकांना आता देशभरातील बँकेच्या शाखांची माहिती मिनिटात मिळू शकते. भारतीय रिझर्व बँकेने (आरबीआय) ठिकाण, कोड आणि परवाने विवरणाची माहिती देण्यासाठी एक डाटाबेस सादर केला आहे.

नुकतेच सुरु करण्यात आलेला बँक ब्रांच लोकेटर एक गतिशील डाटाबेस असून, तो विदेशी, खासगी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकासह कोणत्याही बँकेतील विवरण उपलब्ध करुन देऊ शकतो. या विवरणात ठिकाण, लोकसंख्या, अधिकृत वितरक आणि परवाना विवरण समाविष्ट असेल.

रिझर्व बँकेने एका जाहिरातीत सांगितले आहे की, या डाटाबेसचा वापर करणार्‍या व्यक्ति केंद्राचे नाव, पत्त्यात काही प्रमुख शब्द आदींच्या आधारावर बँक शाखा शोधू शकतात.

देश भरात आता जवळपास ९०,००० बँक शाखा विस्तारलेल्या आहेत. आरबीआयने सांगितले की, या ब्रॉंच लोकेटरमध्ये माहिती दैनिक आधारावर अपडेट केली जाईल.