
डब्लिन, दि. ६ – सोशल नेटवर्किंगसाठी आघाडीवर असलेल्या टिवटरमुळे हरवलेला कुत्रा मालकाला मिळाला आहे. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साइटचा सध्या किती प्रभाव आहे, हे दिसून येत आहे.

डब्लिन, दि. ६ – सोशल नेटवर्किंगसाठी आघाडीवर असलेल्या टिवटरमुळे हरवलेला कुत्रा मालकाला मिळाला आहे. त्यामुळे सोशल नेटवर्किंग साइटचा सध्या किती प्रभाव आहे, हे दिसून येत आहे.
येथील आयरिश रेल यांनी `लॉस्ट डॉग’ अशी ट्विट कुत्र्याच्या फोटोसह टिवटरवर प्रसिद्ध केली होती. आयरिश यांच्या टिवटवर अवघ्या ३२ मिनिटांमध्येच ५०० जणांनी रिप्लाय दिला. यावेळी ड्रायरडे अंगलीन यांने रेल्वे स्टेशनवर एक कुत्रा असल्याचे सांगून, त्याचा फोटोही अपलोड केला.
ड्रायरडे याच्याशी संपर्क साधून आयरिश यांनी मोबाईल क्रमांक मागितला. आयरीशने मोबाईलवर संपर्क साधून आपल्या कुत्र्याबाबत माहिती जाणून घेतली. आयरिश यांनी रेल्वेस्टेशनवर जाऊन कुत्रा ताब्यात घेतला. त्यामुळे हरवलेला कुत्रा मूळ मालकाला काही तासांतच ३० किलो मीटर अंतरावर मिळाला. ते केवळ सोशल नेटवर्किंग साईटमुळेच.
आयरिश म्हणाल्या, ’माझा हरवलेला कुत्रा मला परत मिळेल असे वाटले नव्हते. सोशल नेटवर्किंगचा मी वापर करत असल्यामुळे सहज कुत्र्याबद्दल माहिती अपलोड केली. त्यावर प्रतिक्रीयांचा अक्षरश: पाऊस पडला. नुसता पाऊसच पडला नाही, तर खरोखरच कुत्रा मिळाला आहे. त्यामुळे मला खूपच आनंद झाला. यामुळे टिवटरचा आज मला चांगलाच फायदा झाला आहे.’
`मी, कार मधून उतरून रेल्वे स्टेशनकडे चाललो होतो. सहज टिवटरकडे गेलो असता मला, कुत्रा हरविल्याची टिवट व फोटो पाहायला मिळाला. रेल्वेला वेळ असल्यामुळे मी थांबलो होतो. काही वेळातच तसाच कुत्रा दिसला, मी तत्काळ मोबाईलमधून त्याचा फोटो काढून टिवटरवर अपलोड केला. कुत्र्याचा फोटो एकसारखा असल्यामुळे आयरिश यांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यामुळे काही तासातच मूळ मालकाला कुत्रा मिळाला आहे,’ असे ड्रायरडेने सांगितले.