हरभजन काऊंटीत खेळणार

लंडन, दि. ६ –  आपल्या कामगिरीने निवड अधिकार्‍यांस आपल्या निवडीस हतबल करण्यास अपयशी ठरलेला भारतीय फिरकीपटू हरभजन सिंग काउंटी क्रिकेट प्रकारात खेळणार आहे. हरभजन सिंगने काउंटीच्या स्थानिक सत्राच्या दुसर्‍या हाफमध्ये एसेक्सकडून खेळण्याचा करार केला आहे. नवीन करारानुसार हरभजन एसेक्सकडून आपल्या पहिल्या सामना ११ जुलैपासून ग्लोसेस्टरशायरमध्ये खेळेल.

`क्रिकइंफो’ संकेतस्थळानुसार, एसेक्सने हरभजनशी करार केल्याची पुष्टी केली आहे. एसेक्सचे प्रमुख प्रशिक्षक पाल ग्रेसन हे हरभजन सिंगसोबत करार केल्यावरुन खूप आनंदी आहेत. ते म्हणाले की, हरभजन सिंग त्या खास फिरकीपटूपैकी आहे, ज्याने गेल्या वर्षीदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या नावाची वेगळी जागा बनवली होती. मी एवढ्या मोठ्या खेळाडूच्या एसेक्समधील आगमनाने खूप आनंदी आहे. हरभजन एक मॅचविनर खेळाडू आहे आणि मला अपेक्षा आहे की, तो त्याच्या खेळाची झलक आमच्या संघाकडूनही दाखवेल.

ऑफ स्पिनर हरभजन सिंग यापूर्वीही काउंटीमध्ये खेळला आहे, तो २००५ आणि २००७ दरम्यान वेगवेगळ्या कालावधीत सरेच्या टीमसाठी खेळला होता. त्यात त्याने २१.१० च्या सरासरीने ५७ विकेट घेतले होते. हरभजन गतवर्षी इंग्लंड दौर्‍यात जखमी झाल्यानंतर भारतीय संघात कमी दिसत होता. आगामी श्रीलंका दौर्‍यासाठी बुधवारी निवडलेल्या संघातही त्याला जागा मिळाली नाही.

Leave a Comment