
बॉलीवूडमध्ये कोणाचे नशीब केंव्हा उजळेल हे सांगता येत नाही. आता अभिनेत्री असलेल्या असीनचेच घ्या ना! तिला काही स्टार मंडळीं सोबत काम करता आल्याने सध्या ती हवेतच आहे. काही चित्रपटात बॉलीवूडमधील स्टार सोबत काम करण्याची संधी हे आपले ‘लक’ न मानता असीनने माझ्या सोबत काम करण्यासाठी आघाडीचे नायक मंडळींच धडपडत असतात अशी दर्पोक्ती करायला सुरुवात केली आहे.
