गांगुली, धोनीच सफल कर्णधार – द्रविड

भारतीय संघाच्या दृष्टीने कर्णधार म्हणून सौरव गांगुली आणि महेंद्रसिंग धोनी हे  दोघेच सफल ठरले असल्याचे मत भारतीय संघाच्या फलंदाजीचा एकेकाळी कणा असलेल्या राहुल द्रविडने व्यक्त केले. मला खेळाडू म्हणून गांगुली आणि धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे दोघामधील काही बारकावे मला सांगता आले आहेत. दोघांनीही आपल्या कारकीर्दीत उत्कृष्ट खेळी करून संघासाठी महत्वपूर्ण योगदान दिले असल्याचे राहुलने सांगितले.

प्रत्येक कर्णधाराचे काही तर वेगळेपण असते. गांगुलीमध्ये खूप जोश होता. प्रत्येक सामना जिंकण्याच्या उद्देशानेच तो मैदानात उतरत होता. प्रत्येक सामन्यागणिक वेगळी रणनीती अमलात आणायची त्याची खासियत होती. त्यामुळेच त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली आहे; असे राहूलचे मत आहे.

धोनीकडे एक परिपक्व टीम आहे. त्याच्याकडे संघाचे नेतृत्व कसे करायचे यासाठी लागणारी क्षमता आहे. त्याला प्रत्येक सामना जिंकण्याची सवय आहे.  प्रत्येक  सामन्यात त्याच्याकडील असलेल्या नेतृत्व गुणाचा पुरेपुर वापर करत असतो. त्याच्या या काही चांगल्या गुणामुळेच भारतीय संघाला विश्वचषक जिंकता आला आहे. आगामी काळात तो एक चांगला कर्णधार म्हणून नाव कमवेल असेही राहुल म्हणाला.

Leave a Comment