
श्रीनगर दि.५ – जमात-ए-इस्लाम या काश्मीरमधील एका धार्मिक गटाने काश्मीर खोर्याला भेट देण्यासाठी येताना पर्यटकांनी मिनी स्कर्टसारखे तोकडे कपडे घालू नयेत, असे सांगताना पर्यटन विभागालाही याबाबत सक्ती करण्यास सांगितले आहे. काश्मीर खोर्यात तोकडे कपडे घालू नयेत . अन्यथा लोकांच्या संतापाचा सामना करावा लागेल, असा इशारा या गटाने दिला आहे.
