
अहमदाबाद, दि. ५ – पंतप्रधान बनण्याची गोड स्वप्ने पाहात असणार्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक गोड बातमी आहे. मोदींच्या समर्थकांनी मोदींच्या या स्वप्नाला समर्पित गोड बंगाली मिठाई ’संदेश’ तयार केली आहे. मोदींचा संदेश लोकांपर्यंत संदेशद्वारे पोहोचवण्याचा समर्थकांचा प्रयत्न आहे.
