
तेहरान, दि. ५ – अमेरिकेने जर इराणवर हल्ला केला तर इराण इस्राइलसह मध्य पूर्वेतील अमेरिकेची ठिकाणे १ मिनिटात उध्वस्त करेल अशी इराणने अमेरिकेला धमकीच दिली आहे. तेहरानमध्ये चालू असणारा अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम थांबवण्यासाठी चर्चेतून मार्ग न निघाल्यास इस्राइल इराणवर हल्ला करेल अशी भीती इराणला वाटते आहे.
