हॉटेलच्या वेटरेसने न ओळखल्यामुळे कॅमरुन यांना करावी लागली प्रतीक्षा

लंडन, दि. ५ –  लंडनमधील एका कॅफेमध्ये एका वेटरेसने ब्रिटनचे पंतप्रधान डेविड कॅमरुन यांना न ओळखून त्यांना रांगेमध्ये उभे राहून कॉफीची प्रतिक्षा करण्यास सांगितले. लंडनच्या एका कॅफेची वेटरेस शैला थॉमसने पंतप्रधानांना न ओळखता त्यांना सांगितले की, ती सध्या इतर ग्राहकांना सेवा पुरविण्यात व्यस्त आहे, यासाठी त्यांना थोडी प्रतिक्षा करावी लागेल.

त्यानंतर पंतप्रधानांनी कॅफेच्या जवळील काऊंटरकडून कॉफीच्या बदल्यात चहा घेतला. शैलाने सांगितले की, ती प्रथम त्यांना ओळखू शकली नाही. कारण ती इतर ग्राहकांना सेवा देण्यात व्यस्त होती आणि तिने पंतप्रधानांकडे लक्ष दिले नाही. एवढेच नाही तर शैलाने पंतप्रधानांना रांगेच्या मधून येण्यासही रोखले. या घटनेनंतर कैफेत उपस्थित असलेल्या लोकांनी शैलाला पंतप्रधानांची ओळख करुन दिली.

तथापि, डेविड कॅमरुन यांच्यासोबत पहिल्यांदाच असे झाले नाही, तर यापूर्वीही ते एकावेळी आपल्या कुटुंबासह उन्हाळ्याच्या सुट्ट्यात या कॅफेमध्ये आले होते. त्यावेळीही त्यांना अशीच वागणूक मिळाली होती.