
बॉम्बे सिनेमात हम्मा हम्मा गाण्यावरच्या नृत्यात थिरकलेली आपली मराठी मुलगी सोनाली बेंद्रे तुम्हाला आठवतीय का? कांही चित्रपटात झळकल्यावर गोल्डी बेहेलशी लग्न करून ती गायबच झाली होती. मात्र सोनालीच्या फॅन्ससाठी खूषखबर आहे. मिलन लुथराच्या वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई या सिनेमाच्या दुसर्या भागात म्हणजे सिक्वेलमध्ये ती दिसणार असून हा रोल खास सोनालीला समोर ठेवूनच लिहिला गेला आहे असे मिलनचे म्हणणे आहे. अन्य प्रमुख भूमिकांत अक्षय कपूर, सोनाक्षी सिन्हा आणि इम्रानखान आहेत.
