संगकाराने टाकले ब्रेडमनला मागे

पाकिस्तान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दिलशान आणि कुमार संगकारा यांनी शतक ठोकत पावसाने वाया जाईल असे वाटत असलेल्या या सामन्यात जान आणली आहे. पाकिस्तानने उभारलेल्या ६ गडी बाद ५५१ धावाच्या डोंगराचा पाठलाग करताना श्रीलंकेने पाच गडी गमावून २७८ धावा केल्या होत्या. महत्वाचे म्हणजे कुमार संगकाराने नाबाद १४४ धावा करीत महान फलंदाज असलेल्या सर डॉन ब्रेडमैनाचे २९ शतकाचे रेकॉर्ड मोडले आहे.

हा कसोटी सामना अनिर्णीत राहणार हे निश्चित झाले आहे. श्रीलंकेचे शेवटचे चार फलंदाज लवकर बाद झाले. फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंका संघाला अजून ७४ धावाची आवशकता आहे. या सामन्यात शतक झळकावत कुमार संगकाराने ब्रेडमनला मागे  टाकले. त्याला दिलशाने १२१ धावा करीत उत्तम साथ दिली. या सामन्यात दिलशानने १४ वे कसोटी शतक पूर्ण केले.

संगकाराने ६० धावा पूर्ण केल्या त्यावेळी तो पाकिस्तानविरूद्ध सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला. संगकाराने भारतीय लिटल मास्टर सुनील गावसकरचा २४ कसोटी सामन्यात २०८९ धावांचा विक्रम  मोडला. कुमार संगकाराने हे शतक झळकाविताना पाकिस्तान विरुद्ध सर्वाधिक ९ शतक झळकाविण्याचा विक्रम केला आहे

Leave a Comment