
चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी व्हावा यासाठी दिग्दर्शक मंडळीकडून नेहमीच वेगवेगळी शक्कल लढवली जाते. त्यामध्ये काहीजण यशस्वी होतात. आगामी काळात प्रदर्शित होत असलेल्या दिग्दर्शक अनुराग बसू याच्या चित्रपटात प्रियांका चोप्रा वेगळ्या धाटणीची भूमिका करीत आहे. तिच्या भूमिकेबाबत कोणीच माहिती देत नाही. याबाबत होणाऱ्या प्रमोशनच्या कार्यक्रमात या चित्रपटतील अभिनेता रणबीर कपूर, एलींना डिसूझा यांच्यासह अभिनेत्री प्रियांका चोप्रा सहभागी होणार आहे. मात्र यावेळी प्रियांका तिच्या भूमिकेविषयी काहीच सांगणार नाही असे दिसते.
