नवी दिल्ली दि.४ – टाटा ग्रूपची कंपनी असलेल्या व्होल्टास इंडियाने २०१२ मध्ये एअरकंडिशनर व्यवसायातील सर्वात मोठी कंपनी म्हणून आघाडी घेतली असून त्यांनी एलजी या कोरियन कंपनीला मागे टाकले आहे.

नवी दिल्ली दि.४ – टाटा ग्रूपची कंपनी असलेल्या व्होल्टास इंडियाने २०१२ मध्ये एअरकंडिशनर व्यवसायातील सर्वात मोठी कंपनी म्हणून आघाडी घेतली असून त्यांनी एलजी या कोरियन कंपनीला मागे टाकले आहे.
नेल्सन इंटिया या मार्केट रिसर्च करणार्या कंपनीने जाहीर केलेल्या डेटानुसार व्होल्टास या ७००० कोटी रूपये भागभांडवल असलेल्या कंपनीने आपला मार्केट शेअर १८.३ वर नेला असून परिणामी त्यांच्या शेअरच्या किमतीही पाच टक्कयांनी वाढल्या आहेत. गतवर्षात म्हणजे जुलै ११ मध्ये एलजी या कंपनीचा एसी मार्केट शेअर ९० टक्के म्हणजे २२.६ टक्के होता. तो यावर्षात १७.७ वर घसरला असून व्होल्टास १८.३ टक्क्यांवर गेल्याने ती या क्षेत्रातील लिडर ठरली आहे.
व्होल्टास इंडियाने एसी क्षेत्रात असलेली तीव्र स्पर्धा लक्षात घेऊन किंमती अतिशय स्पर्धात्मक ठेवल्या होत्या. तसेच त्यांचे विडो एसी प्रथमपासूनच उत्कृष्ठ दर्जाचे असल्याने त्याची मागणी कायम राहिली तर त्यांनी त्यांच्या ऑलवेदर एसी साठी मार्केटिंग चांगल्या प्रकारे केल्याने त्यांच्या एसीसाठी बाजारात मागणी वाढली असे सांगण्यात आले आहे.