पाकमधील शाळेत भगवद्गीतेचा अभ्यास!

कराची, दि. ४ –  येथील एका शाळेमध्ये भगवदगीतेचा अभ्यास घेतला जात असल्याचीही माहिती  आली आहे. विशेष म्हणजे मध्यंतरी पाकिस्तानातील काही शाळांमध्ये दहशतवादाची बाराखडी शिकवली जाते, असा दावा पाकिस्तानमधील शास्त्रज्ञ परवेझ हूदभॉय यांनी केला होता.

येथील मुस्लिमबहुल भागात असलेल्या सांता मारिया स्कूलमधील विद्यार्थी रोज भगवदगीतेतील श्लोकांचे पाठांतर करतात. हिंदू धर्मातील विद्यार्थी आपल्या धर्माचे शिक्षण या शाळेत घेत असून, लवकरच येथे गीतेवर आधारित प्रश्‍नांवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती पाकिस्तानी हिंदू सेवेचे (पीएचएस) अध्यक्ष संजेश धंजा यांनी दिली.

धंजा म्हणाले, `१५ जुलैपासून प्रश्‍नांवर आधारित कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, या कार्यक्रमामध्ये येथील मुस्लिम मुस्लिम समाज सहभागी होणार आहे, हेच सर्वांत मोठे आमचे यश असेल.’

विशेष म्हणजे या कार्यक्रमावर येथील कोणीही आक्षेप घेतला नसून, हा एक चांगला धार्मिक कार्यक्रम आहे, असे मुस्लिम आयोजकांपैकी यासिर कामजी म्हणाले.