
जगप्रसिद्ध अॅपलला त्यांच्या आयपॅड ट्रेडमार्कच्या मालकीसाठी अखेर फडतूस चीनी कंपनीशी तब्बल सहा कोटी अमेरिकन डॉलर्स मोजून समझोता करण्याची वेळ आली आहे. अॅपल आणि चीनच्या प्रोव्ह्यू या कंपनीत हा सेटलमेंट करार आज पार पडला. या चीनी कंपनीने अॅपलच्या टॅबलेट विक्रीवर चीनमध्ये बंदी आणण्याचे पाऊल उचलल्याने अॅपलने हा सौदा केला असे सांगण्यात येत आहे. आता प्रीव्ह्यू कंपनी अॅपलला आयपॅड ट्रेडमार्कचे हक्क देणार आहे.
