
करीमगंज,२जुलै-’फेसबुक’वरील बॉयफ्रेन्डशी विवाहबद्ध झालेल्या काँग्रेसच्या महिला आमदारासह तिच्या पतीची शुक्रवारी रात्री एका हॉटेलमध्ये जमावाने धुलाई केली. परंतु, मारहाण करण्यासाठी आलेल्या जमावापैकी अनेकांनी बलात्काराचा प्रयत्न केला, असा आरोप या आमदाराने केला आहे. रुमी नाथ असे या महिला आमदाराचे नाव आहे.
आधीच्या पतीला घटस्फोट न देता रुमीने ’फेसबुक’वरील मित्राशी विवाह केल्यामुळे त्यांना मारहाण झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आसाममधील करीमगंज येथील एका हॉटेलमध्ये आमदार रुमी नाथ आणि तिच्या बॉयफ्रेन्ड जकी झाकिर थांबले होते. रात्री उशीरा जवळपास दोनशे लोकांनी मारहाण केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने त्यांची सुटका झाली. याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
घटनेबद्दल नाथ यांनी सांगितले की, जमावापैकी अनेक जण दारुच्या नशेत होते. त्यांनी तिचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. हल्ला करणार्यांना तर ओळखतच नाही. राजकीय हेतूने हल्ला प्रेरीत असल्याचा आरोप करतांनाच रुमी नाथ यांनी विवाह हा तिच्या खासगी आयुष्याचा प्रश्न असून कोणालाही त्यात हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही, असे स्पष्ट केले.
