नवी दिल्ली, दि. २ – इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ई-फायलिंग बंधनकारक असल्याचे सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेशनने एका नोटीसद्वारे कळवले आहे. आर्थिक वर्ष २०१२ – २०१३ साठी ई-फाईलिंग अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे.

ई फायलिंगमुळे करदात्यांना परतावा लवकर परत मिळतो. करदात्याचे टॅक्स क्रेडिट त्यांना पाहण्यास मदत होते. ई-मेल आणि एसएमएसने टॅक्सशी संबंधित अपडेट करदात्यांना देणे आयकर विभागाला शक्य होते.
ई-रिटर्नच्या आयटीआर-२, आयटीआर-३ आणि आयटीआर-४ साठी डिजिटल सही बंधनकारक नाही, मागील वर्षी आयकर विभागाकडे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने भरलेले १ कोटी ६४ लाख टॅक्स रिटर्न जमा झाले होते.