ऑलिम्पिक सुरक्षेसाठी क्षेपणास्त्र

लंडन, दि. ३ –  अलकायदा लंडन ऑलिम्पिकवर नेम साधण्याच्या प्रयत्नात आहे. मीडिया वृत्तात झालेल्या या खुलास्याने ब्रिटेनला नवीन पद्धतीने सुरक्षेचे धोरण बनवण्यावर हतबल केले आहे.

वृत्तानुसार ऑलिम्पिक खेळाच्या सुरक्षेसाठी लंडनमध्ये सहा ठिकाणी क्षेपणास्त्र तैनात करण्याची योजना बनली आहे. ऑलिम्पिकची सुरूवात २७ जुलैपासून होणार आहे.

ऑलिम्पिक खेळाची सुरूवात होण्यात महिना देखील बाकी नाही आणि यादरम्यान या वृत्ताने खळबळ पसरवली आहे की, दहशतवादी संघटना अलकायदा लंडन ऑलिम्पिक खेळावर नेम साधण्याच्या प्रयत्नात आहे. या वृत्ताला ब्रिटेनच्या सरकारने गंभीरतेने घेतले असून, आता ऑलिम्पिकच्या सुरूक्षेवर नवीन पद्धतीने धोरण तयार केले जात आहे.

एक वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार ऑलिम्पिक खेळाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनाने लंडनमध्ये सहा ठिकाणी जमीनीवरून हवेत मार करणारे क्षेपणास्त्र तैनात केले जाईल. कारण वृत्त आहे की, ऑलिम्पिकपूर्वी अलकायदा अमेरिकन विमानावर ताबा मिळवून त्याद्वारे एयरपोर्टची सुरक्षा उध्वस्त करू शकते.

मीडिया वृत्तानुसार अलकायदाने यासाठी नार्वेच्या एक नागरीकाला आपल्यात समाविष्ट करून त्याला विशेष प्रकारे प्रशिक्षण देखील दिले आहे.
लंडनमध्ये ज्या सहा ठिकाणी क्षेपणास्त्र तैनात करण्याचे वृत्त आहे. त्यात टावर हेलमेटसमधील लेक्सिंगटन बिल्डिंग, वाल्थम फॉरेस्टमधील फ्रेड विग टॉवर, ब्लॅकहीथ कॉमन एल्थममधील ऑक्स्लीस वुड ऍनफिल्डमधील विलियम गिरलिंग रिजर्ववायर व ऍप्पिंग फॉरेस्टमधील बार्न हिल्स.

लंडनचे हे सहा ठिकाण निवासी असून येथे चांगली लोकसंख्या आहे. यामुळे काही लोक येथे क्षेपणास्त्र तैनात करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा विरोध करत आहेत. परंतु ब्रिटेनचे सुरक्षा मंत्रालय सुरक्षेला खुप आवश्यक सांगून लोकांना सतत सहकार्य करण्याचे अनुरोध करत आहेत.