
पुणे,२ जुलै-आषाढी एकादशीच्या दिवशी तीस ते चाळीस तास दर्शनबारीत थांबणार्या वारकर्यांना आता लाडक्या विठुरायाचे दर्शन ऑनलाईन बुकिंगने मिळू शकणार आहे. येत्या कार्तिकी एकादशीपासूनच वारकर्यांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

पुणे,२ जुलै-आषाढी एकादशीच्या दिवशी तीस ते चाळीस तास दर्शनबारीत थांबणार्या वारकर्यांना आता लाडक्या विठुरायाचे दर्शन ऑनलाईन बुकिंगने मिळू शकणार आहे. येत्या कार्तिकी एकादशीपासूनच वारकर्यांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
अशी ऑनलाइन दर्शन बुकिंग सेवा तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आहे. त्याच धर्तीवर आता पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेता येणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने दर्शनबारीत तीस तासांहून अधिक काळ रांगेत उभ्या असलेले आणि चालून पाय सुजलेले वारकरी पाहिल्यानंतर विभागीय आयुत्त* प्रभाकर देशमुख यांनी ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.
लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला येतात. संपूर्ण दिवस रांगेत थांबूनही अनेकांना विठ्ठलाचे दर्शन होत नाही. पाच-सहा किलोमीटरची रांग बघितल्यावर अनेक भत्त* कळसाचे दर्शन घेऊन परत फिरतात. मात्र, अनेक वारकरी विठुरायाच्या ओढीने तीस-पस्तीस तास रांगेत थांबतात. शौचालयाच्या सुविधेपासून अनेक गैरसोयींनी तोंड देत ते थांबतात. उभे राहून अनेकांचे पाय सुजतात. मात्र, दर्शन झाल्याशिवाय ते माघारी फिरत नाहीत.
दर्शनबारीत तासन्तास थांबण्याचा त्रास कमी करण्यासाठी वारकर्यांना ऑनलाइन दर्शन बुकिंगची सेवा दिली जाणार आहे. गावातील पन्नास ते साठ वारकर्यांच्या ग्रुपने, दिंडीचालकांनी ऑनलाइन अर्ज केल्यावर त्यांना दर्शनपास व दर्शनाची वेळ दिली जाणार आहे. हे पास तपासल्यानंतर संबंधितांना थेट दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी त्यांना फार काळ रांगेत थांबावे लागणार नाही. एका मिनिटाला साधारणतः चाळीस भाविक विठ्ठलाचे दर्शन घेऊ शकतात. तासाला अडीच हजार वारकर्यांचे दर्शन होऊ शकते.
विठ्ठल मंदिराचेही फायर ऑडिट…
मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचेही फायर ऑडिट करण्याचा निर्णय विभागीय आयुत्त* प्रभाकर देशमुख यांनी घेतला आहे. मंदिरातील इलेक्टि*क वायरिंग जुने झाले आहे. तसेच जुन्या काळातील लाकडी मंडपही मंदिरात आहे. या ठिकाणी आगप्रतिबंधक यंत्रणा बसवितानाच अग्निसुरक्षेची दक्षता घेतली जाणार आहे.