सोनियांच्या मुळ विदेशीवर पुन्हा संगमा पलटले

नवी दिल्ली, दि.२ – राष्ट्रपती पदासाठी विरोधी उमेदवार पीए संगमा यांनी कॉंग्रेस  अध्यक्षा सोनिया गांधींच्या मुळ विदेशी मुद्यावर पुन्हा आपले वर्तन कठोर केले आहे.
या मुद्यावर आपल्या दृष्टीकोणात नरमीवर दुर्लक्ष करून संगमा म्हणाले की, विदेशी मूळच्या व्यक्तीला भारताचे पंतप्रधान बनवु नये.
एक वृत्तसंस्थानुसार शनिवारी संगमा म्हणाले,  `आता माझे हे मत आहे. भविष्यातही माझे हेच मत राहील. मृत्युपर्यंत मी एखाद्या परकीयाला पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनवण्याचे समर्थन करणार नाही.’
वर्ष १९९९ मध्ये विदेशी मूळच्या व्यक्तीला पंतप्रधान न बनवण्याच्या मुद्यावर पीए संगमा, शरद पवार व तारिक अनवर यांनी कॉंग्रेस  सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस  पक्ष बनवला परंतु नंतर त्यांनी या मुद्यावर आपले मतात बदल केला होता.

यावर्षी २२ मे ला संगमा म्हणाले होते,  `आता हा अध्याय बंद झाला आहे. मी याबाबत सोनिया गांधींकडे जाऊन माफी मागितली आहे. मी त्यांना सांगितले की, तुमच्याकडे पंतप्रधान बनवण्याची चांगली होती, तुमच्याकडे सं ख्या देखील होती परंतु तरी देखील तुम्ही नकार दिला. मी यावर खुप आनंदी असून मी त्यांना भुतकाळ विसरून जावे असे सांगितले.’

पुस्तकामुळे वाद
माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या येणार्‍या पुस्तकामुळे हा वाद पुन्हा उभरला आहे. पुस्तकात कलाम म्हणतात की, सोनिया गांधी २००४ मध्ये पंतप्रधान बनु इच्छित होत्या. कलामनुसार त्यांच्याकडेही त्यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नव्हता.

यापूर्वी ही चर्चा होती की, एपीजे अब्दुल कलाम यांनी मुळ विदेशी असण्याच्या नाते सोनिया गांधींना पंतप्रधान बनवण्यास नकार देण्यात आला होता यानंतर त्यांनी मनमोहन सिंग यांची या पदावर निवड केली होती.

राष्ट्रपती निवडणुकीत कॉं सचे समर्थन न मिळाल्यानंतर संगमा आपल्या जुन्या वर्तनावर पुन्हा परतले. लोकसभेचे माजी अध्यक्ष हे सांगून कॉंग्रेसला समर्थन मागितले होते की, यावेळी एक आदिवासी नेत्याला भारताचा राष्ट्रपती बनवायला हवे.

Leave a Comment