रुपया दोन टक्क्यांनी मजबूत

मुंबई, दि. १ – रुपयाच्या किंमतीत शानदार तेजी नोंदविली गेली. डॉलरच्या तुलनेत रुपया ११९ पैसे अर्थात २.१० टक्के  मजबूत होऊन  ५५.६१ च्या  भावावर बंद झाला. एक दशकात रुपयाची ही दुसरी सर्वात मोठी वाढ आहे.

जनरल अँटी-टॅक्स एवॉयडेंस रूल्स म्हणजेच ’गार’बाबत स्थिती स्पष्ट झाल्याने वाढलेल्या भांडवली गुंतवणुकीमुळे रुपयाची स्थिती सुधारण्यात मदत झाली. यूरोपीय संघाने आश्चर्याचा धक्का देत वित्तीय प्रणालीची स्थिती सुधारण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे.  यातही  अमेरिकी चलनात असलेल्या तेजीला आवर घालण्याचे काम केले आहे. त्याचा  फायदा रुपयाला मिळाला.

आंतरबँक विदेशी चलन बाजारात रुपया ५६.५५ च्या स्तरावर उघडेल. ’गार’बाबत स्थिती स्पष्ट झाल्यानंतर विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (एफआयआय)ने घरेलू बाजारात तीन हजार कोटी रुपये किंमतीचे शेअर खरेदी केले.