नेहा धुपियाचे गुंतलीय जाहिरातीत

अभिनेत्री नेहा धुपिया गेल्या काही दिवसापासून चित्रपटात कमी तर जाहिरातीमध्ये जास्त दिसायला लागली आहे. मोबाईल फोन पासून ते शेविंग फोमच्या जाहिरातीमधून सध्या ती झळकत आहे. त्यामुळे नेहा सध्या चित्रपटसृष्टीतून गायब झाली की काय अशी चर्चा ऐकावयास मिळत आहे.

नेहाचे म्हणणे मात्र वेगळेच आहे. सध्या तिच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून तो चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. तर दोन चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु आहे. त्यामुळे यामधून वेळ मिळाल्यानंतर ती जाहिरातीचे चित्रीकरण करत असते. कबीर कोशिश दिग्दर्शित चित्रपटात नेहा अभिनेता सोनू सूद व नसरुद्दिन शाह सोबत दिसणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी वेळ देत आहे. 

त्याशिवाय आणखी  दोन चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. त्यामधून वेळ मिळाल्यानंतर ती जाहिराती करत असते. सध्या तिला जाहिरातीच्या बऱ्याच ऑफर आल्या आहेत. त्यासाठी वेळ असल्याने ती त्या स्वीकारत  आहे. चांगल्या जाहिराती मिळत असतील तर का स्वीकारू नये असा सवालही तिने यावेळी उपस्थित केला. सध्या ती दिल्लीमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनाच्या कामात व्यस्त आहे