
मुंबई, १ जुलै-आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात नेत्यांची टोलवाटोलवी सुरुच आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या साक्षीत आज पुन्हा हेच समोर आले. अशोक चव्हाणांनी या प्रकरणात विलासरावांकडे बोट दाखवले आहे. मुंबई, पुणे यातील जमीन वाटपाचे अधिकार मुख्यमंत्र्यांच्या कक्षेत येतात, ते महसूलमंत्र्यांच्या कक्षेत येत नसल्याचे सांगत, त्यांनी याप्रकरणात हात झटकले आहेत.
