शाहीद कपूर कॅटरीनासोबत ‘इश्क`चित्रपट करणार

आता तर सलमान खान शाहीद कपूरकडे व्यवस्थित बघेल असे वाटते, त्यासाठी कारण ही तसेच आहे. शाहीद आगामी काळात सलमानची पुर्वप्रेमिका कॅटरीनासोबत `इश्क’ हा चित्रपट करणार आहे. त्यामुळे सलमान खानला शाहिदची काही काळ का होईना मनधरणी करावी लागणार आहे. ही जोडी फक्त ऑन स्क्रीनच असणार आहे. नाही तर सलमान खानवर काय वेळ आली असते याचे वर्णनही न केलेलेच बरे. आगामी काळात जर सर्व काही ठीक चालले तर प्रभूदेवाच्या `नमक’ या चित्रपटात कॅटरीनासोबत शाहीद कपूर दिसणार आहे.

तसे पहिले तर शाहीद सुद्धा कॅटरीनासोबत काम करण्यास उत्सुक आहे. दोघांमधील  पहिलाच हा चित्रपट असून प्रेम कहाणीवर आधारित आहे. यापूर्वीच ही जोडी एका चित्रपटासाठी एकत्रित येणार होते. मात्र नंतर हा चित्रपट रद्द करण्यात आला होता. २००७ साली दिग्दर्शक राजकुमार संतोशी यांनी शाहीद व कॅटरीनाला सोबत घेऊन एक चित्रपट काढण्याचा प्लान तयार केला होता. मात्र अंतिम क्षणी हा चित्रपट रद्द करण्यात आला. यानंतर इच्छा असूनही दोघांना एकत्रित काम करता आले नव्हते. इम्तियाझ अली यांची पत्नी प्रीती या दोघांना घेऊन एक चित्रपट तयार करण्याच्या विचारत असताना तिनेही हा प्लान अचानक रद्द केला . त्यानंतर मात्र या दोघांना एकत्रित घेऊन चित्रपट निर्माती करण्याचा विचार कुणीच केला नाही.

सध्या प्रभुदेवा हा एका चित्रपटाची निर्मिती करत असून त्याच्या `नमक’ या चित्रपटात शाहीद हा मध्य प्रदेशमधील तरस्काची भूमीका करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण जानेवारी २०१३ नंतर होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment