विद्या बालन व फरहान अख्तरची जोडी जमणार

प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालन व अभिनेता फरहान अख्तर जोडीचा पहिलाच चित्रपट शादी के साईड इफ्फेक्ट हा लवकरच येत आहे. यापूर्वी विद्या व फरहानने एकत्रित चित्रपट केला नसल्याने दोघेही काम करण्यास उत्सुक आहेत. यावर्षीच्या सर्वच फिल्म फेअर अवार्ड मध्ये विद्याचा द डर्टी पिक्चरची जादू दिसून येत होती. त्यामुळे विद्याचा भाव चांगलाच वधारला आहे.

गेल्या काही दिवसापासून फरहानला अभिनेत्री विद्यासोबत चित्रपट करायचा होता मात्र त्यासाठी चांगली स्क्रिप्ट मिळत नसल्याने त्याचे हे स्वप्न पूर्ण झाले नव्हते. मात्र आता त्याला शादी के साईड इफ्फेक्ट या चित्रपटातून चांगली संधी मिळाली आहे. फरहानने बॉलिवूडमध्ये स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तो मोजक्याच चित्रपटात काम करतो.

शादी के साईड इफ्फेक्ट या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचल्यानंतर काम करण्यास लगेचच विद्या बालनने होकार दर्शिवला आहे. फरहानने केलेल्या अभिनयाचे विद्याने काही दिवसापुर्विंच कौतुक केले होते. त्यावेळीच भविष्यात संधी मिळाली तर मी त्याच्या सोबत काम करेन असे सांगितले होते. त्यामुळे संधी चालून आल्याने विद्याने होकार दर्शविला आहे. आगामी काळात लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करण्यात येणार असल्याचे समजते.